Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती

    Views

    महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती



    महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती......

    १९५१ मध्ये भारतात आदिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा ४था क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकुण ४७ आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत.
    warli pentings


    १) सह्याद्री विभाग:-

    = नाशिक,रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर, पुणे इ.

    = मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकुर, दुबळा धोडीया इ.

    २) सातपुडा विभाग:-

    = धुळे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, नांदेड इ.

    = कोकणा, पावरा, गामीत, गावीत, भिल्ल, कोरकू, धानका, पारधी, नायकडा, राठवा इ.

    ३) गोंडवन विभाग:-

    = चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर इ.

    = गोंड, आंध, कोलाम, परधान, हळबा-हळबी, कावर, थोटी- थोट्या, कोरकू, माडीया, राजगोंड इ.

    मुळात अकोले तालुक्याचा पश्चिम पट्टा हा डोंगराळ आणि वेगवेगळ्या आदिवासींची वस्ती असलेला शेकडो कदाचित हजारो वर्षापासून या आदिवासी जमाती या पर्वतराजीच्या कुशीत आपले नैसर्गिक


    जीवन जगत आहेत. गेल्या १०-२० वर्षापासून दळणवळणांच्या साधनांमुळे त्यांच्या नागरी वस्तीशी आणि नागरसमाजाशी संबंध येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या विचारसरणी, राहणीमान, दृष्टीकोनात बदल दीसू लागला आहे. परंतु अशा परिस्थितीतही मागच्या पीढीतील अनेकांनी तालुक्याचे गाव पाहिलेले नाही. या आदिवासींमध्ये महादेव कोळी या समाजाची वस्ती सर्वात जास्त आहे. गेली अनेक शतके इथला आदिवासी पुर्णत: आदिम जीवन जगत होता. १९७७ साली(कुमशेत येथील) तेव्हाण्चे आदिवासी जीवन यात पुष्कळ बदल झालेला असला तरी त्यांच्या समस्या नागरी समस्यांपेक्षा कितीतरी भयानक आहेत. पावसाळ्यात त्यांच्या हालाला पारावर नसतो. प्रवरा खोर्यातील आदिवासींपेक्षा मुळा खोर्यातील आदिवासी अधिक समस्याग्रस्त आहेत. सरकारी योजना व मिळणार्या अनुदानामुळे त्यांना निवारा, कपडा, रेशन, औषधोपचार, मुलांचे शिक्षण इ. सुविधा मिळू लागल्या आहेत. त्यामुळॆ पुर्वीपेक्षा जीवनस्तर निश्चितच उंचावला आहे. पण ज्या कुंटुबात अजुनही कोणी शिकलेले नाही, त्यांच्या जीवनमानात फारसा फरक नाही.

    संदर्भ: हरिश्चंद्रगड-श्री.विठ्ठल शेवाळॆ.


    ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत आदिवासींना विविध नावाने संबोधले जाऊ लागले......ते खालीलप्रमाणे......



    1. १९०१=पशुपालक

    2. १९११=पशुदेववादी

    3. १९२१=डोंगरी व वन्यजमाती

    4. १९३१=आदिम जमाती

    5. १९४१=जनजाती

    6. १९३५ च्या कायद्याने

    7. १९५० च्या संविधानानुसार= वन्यजमाती(जनजाती)
    Q: आदिवासी कुणास म्हणावे???????
    "धरतीला खर्या अर्थाने आपली माता मानणारे हे आदिम जन, आदिवासी, जन्मभर नाचणारी, गाणारी, राकट शरीराची पण निरागस मनाची माणसं, प्रगतीकडे जाणार्या आधुनिक शिक्षणाच्या पहिले पाऊल टाकण्याआधी धार्मिक चालीरीती, मागासलेपणा, आर्थिक दुर्बलता, भुतेखेते व देवदेवतांच्या जंजाळातून बाहेर पडावे की न पडावे या संभ्रमात वेळ घालावणारी माणसं, ही निसर्गपुजक संस्कृतीशी, निसर्गाशी एकरुप झालेली भोळीभाबडी माणसं, गतिहीन व रुढीप्रिय समाज म्हणुन "आदिवासी" असे ओळखले जातात..........                              

    No comments:

    Post a Comment