Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    हिमालयातील काही महत्त्वाच्या दऱ्या - खिंडी

    Views


    हिमालयातील काही महत्त्वाच्या दऱ्या - खिंडी


    • हिमालयातील काही महत्त्वाच्या दऱ्या 

    1. काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.
    2. कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.
    3. कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.
    4. काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.
     १. शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) : 

                      हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.

    २. हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण :
               
                बुरार्ड यांच्या मतानुसार हिमालयाचे वर्गीकरण खालीलप्रकारे करण्यात आले आहे- पंजाब हिमालय, कुमाऊँ हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय.
    1. पंजाब हिमालय : सिंधू आणि सतलज नदी यांदरम्यान पंजाब हिमालयाचा भाग असून याची लांबी ५६० किमी इतकी आहे.
    2. कुमाँऊ हिमालय : सतलज आणि काली नदी यांदरम्यान कुमाँऊ हिमालयाचा भाग असून याची लांबी ३२० किमी इतकी आहे.
    3. नेपाळ हिमालय : काली नदी आणि तिस्ता नदी यांदरम्यान नेपाळ हिमालयाचा भाग असून याची लांबी ८०० किमी इतकी आहे.
    4. आसाम हिमालय : तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांदरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून याची लांबी ७२० किमी इतकी आहे.
    5. पूर्वाचल : पूर्वेकडे दिहांग घळई ओलांडल्यानंतर हिमालय पर्वतरांगा दक्षिणेकडे वक्राकार गतीने वळलेल्या दिसतात. उत्तर दक्षिणेकडे जाताना त्यामुळे टेकडय़ांची एक मालिकाच तयार झाली आहे. यामध्ये पुढील उपविभागाचा समावेश होतो- पूर्व- नेफा, नागा रांगा, मणिपूर टेकडय़ा, उत्तर केचर टेकडय़ा, मिझो टेकडय़ा, त्रिपुरा टेकडय़ा.
    = पूर्व- नेफा : यामध्ये मिश्मी टेकडय़ा आणि पतकोई रांगा यांचा समावेश होतो.

    = मिश्मी टेकडय़ा : मिश्मी टेकडय़ांमध्ये पूर्वाचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. येथील अनेक शिखरांची उंची ४५०० मी.पेक्षा जास्त आहे.

    = नागा रांगा : नागालॅण्ड आणि म्यानमार यांदरम्यान नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकडय़ा आहेत.

    = मणिपूर टेकडय़ा : भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून मणिपूर टेकडय़ा आहेत. मणिपूर टेकडय़ांमध्ये लोकटॅक सरोवर आहे. लोकटॅक सरोवरात अभिकेंद्री नदीप्रणाली आढळून येते.

    हिमालयातील महत्त्वाच्या खिंडी :
    1. अघिल खिंड- लडाख आणि चीनमधील सिक्यँग प्रांताला जोडते. 
    2. बनिहाल खिंड- यामुळे श्रीनगर-जम्मू ही शहरे जोडली गेली आहेत. 
    3. पीरपंजाल- ही जम्मू आणि श्रीनगरला जोडणारी खिंड आहे. 
    4. झोझिला खिंड- यामुळे श्रीनगर, कारगिल, लेह जोडले जातात. 
    5. बारा-लाच्या-ला खिंड- यामुळे मनाली-लेह जोडले जातात. 
    6. बुर्झिल खिंड- या खिंडीमुळे हिमाचल प्रदेश आणि लडाख जोडले जातात. 
    7. रोहतांग खिंड- या खिंडीमुळे हिमाचल प्रदेशातील कुलू- लाहुल-स्पिती या दऱ्या एकमेकांबरोबर जोडल्या जातात. 
    8. लि-पु लेक- उत्तराखंडातील पिढूर जिल्ह्य़ातील या खिंडीतूनच मान सरोवराकडे यात्रेकरू जातात. या खिंडीमुळे उत्तराखंड तिबेटशी जोडला गेला आहे. 
    9. जे-लिपला खिंड- सिक्कीममधील या खिंडीमुळे सिक्कीम आणि तिबेटची राजधानी ल्हासा जोडले जातात. 
    10. नथुला- भारत आणि चीनच्या सरहद्दीवर नथुला ही खिंड आहे. १९६२ च्या युद्धानंतर २००६ ला ही खिंड वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केली.

    No comments:

    Post a Comment