Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : लोहखनिज

    Views

    महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती :

    महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.


    महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

    लोहखनिज:
    भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात.


    पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.
    • चंद्रपूर - चिमुर तालुक्यात िपपळगाव, भिसी, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत.
    • गडचिरोली - गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात.
    • गोंदिया - गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्य़ात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.
    • सिंधुदुर्ग - या जिल्हय़ात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकडय़ांत दोन किमी लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत.
    • कोल्हापुर - या जिल्ह्य़ात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.


    No comments:

    Post a Comment