Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

    Views

    सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

    विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व - पश्चिम दिशेत (वायव्य - आग्नेय)
    A. सातमाळा - अजिंठा डोंगररांगा :  
    1. पूर्व - पश्चिम दिशेत विस्तार
    2. जिल्हा - नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.  
    3. उंची - 200 ते 300 मीटर 
    4. ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.
    5. पश्चिमेकडील भागास - 'सातमाळा'
    6.  पूर्वेकडील भागास - 'अजिंठा' म्हणतात.
    7.  या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्‍यात अजिंठा लेण्या आहेत.    
    8.  या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.
    • धुळे - गाळणा डोंगर 
    • नांदेड - निर्मल डोंगर 
    • औरंगाबाद - वेरूळ डोंगर 
    • हिंगोली - हिंगोली डोंगर 
    • नांदेड - मुदखेड डोंगर 
    • यवतमाळ - पुसद टेकड्या 
    • सातमाला - सप्तश्रुंगी(1416 मी. )
    • तौला - (1231 मी.)
    • अंकाई - टंकाई - (961 मी.)
    • सुरपालनाथ - (958 मी.),
    •  सतमाळा - (945 मी.)
    •  अजिंठा - शिरसाळा (885 मी.)
    • बुलढाणा (546 मी.)
         पठार - मालेगाव व बुलढाणा पठार.

    B. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर :  
    1. आग्नेय : वायव्य दिशेत.
    2. जिल्हा : पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर.
    3. नाणे घाटापासून(हरिश्चंद्र - 1424) पूर्वेकडे उंची कमी होत जाते. ही डोंगररांग पुढे आग्नेयेस हैद्राबादपर्यंत जाते. 
    4. पश्चिमेकडील भागात : हरिश्चंद्र गड व पूर्वेकडील भागास - बालाघाट.
    5. या डोंगर रांगेत पुढील डोंगररांगांचा समावेश होतो.
    6. अहमदनगर - हरिश्चंद्र डोंगर, पुणे - तसूमाई डोंगर, अहमदनगर - बाळेश्वर डोंगर इ.
    7. बीड, लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यात बालाघाट डोंगर पसरली आहे. 
    8. बालाघाट डोंगर रांगेत तुळजाभवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर व नळदुर्ग येथे नळराजांनी बांधलेला किल्ला आहे.
    C. महादेव डोंगर रांगा  :
    1. वायव्य ते आग्नेय दिशेत.
    2. महाबळेश्वर - पाचगणीपासून आग्नेयेस.
    3. आग्नेयकडे कर्नाटककाकडे कमी होते.
    4. या डोंगररांगेत शंभू महादेवाचे पवित्र देवालय आहे. (शिखर शिंगनापुर)
    5. या रांगेत पुढील डोंगर आहेत. सातारा -बामणोली, कर्हाड - आगाशीव डोंगर.
    6. या रांगेत सासवड पठार, औंध पठार, खानापूर पठाराचा समावेश होतो.
    7. महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर
     कोल्हापूर-पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर
     नंदुरबार - सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर
    अमरावती - गाविलगड टेकड्या व मेलघाट डोंगर
     नागपूर - गरमसुर, अंबागड व मनसर टेकड्या
     गडचिरोली - भामरागड, सुरजगड, चिरोली, चीमुर टेकड्या
     भंडारा - दरेकसा, नवेगाव टेकड्या
     गोंदिया - दरेकसा, नवेगाव टेकड्या
     चंद्रपुर - चांदूरगड, पेरजागड.

    No comments:

    Post a Comment